भुसावळ (प्रतिनिधी )-
आर्या फाउंडेशन संचिलत अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच हिरकणी महिला मंच आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजातील सामाजिक ,शैक्षणिक , विविध क्षेत्रात कार्यरत सात कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच हिरकणी महिला मंच तर्फे संक्रांती निमित्त हळदी कुंकू व वाण लूटन्याचा कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमांचे उद्घाटन रोटरी क्लबअध्यक्ष सनासे यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली प्रसंगी व्यासपीठावर महिला महाविद्यालय भुसावळच्या प्राचार्य श्रीमती मंगला साब्रदा, डॉ मधु मानवतकर, आर्या फाउंडेशन संचालिका डॉ वंदना वाघचौरे ,अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज च्या प्राचार्य प्रा.मनीषा बाविस्कर , ममता सनांसे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी
सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातिल कर्तुत्ववान महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये महिला समुपदेशन केंद्राच्या भारती म्हस्के , पत्रकार उज्वला बागुल, मीरा मोरे ,शिलांबरी जमदाडे, शैला कुमावत, प्रतिभा तायडे, सुपडाबाई गायकवाड यांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी महिलांसाठी उखाना स्पर्धा व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
डॉ.वंदना वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, प्रा,मंगला साब्रदा यांनी उपस्थित महिलांना प्रत्येक महिलेत एक हिरकणी असते हे त्यांच्या भाषणात सिद्ध करून दिले
तर डॉ मधू मांनवतकर यांनी महिला आरोग्यासाठी काही टिप्स दिल्या, तर प्रा.मनिषा बाविस्कर यांनी कोविड ची परिस्थिती पाहता आरोग्य क्षेत्रात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातुन विध्यार्थी व विद्यार्थिनींनां करियरच्या संधी फाउंडेशन उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले . हिरकणीच्या उपाध्यक्ष अंजुम खान यांनी हिरकणी महिला मंचची प्रस्तावना मांडली,तर संजय भटकर यांनी रोटरीच्या उपक्रमाबाबत माहिती दीली .
सर्व सन्मानार्थीच्यावतीने उज्वला बागुल यांनी मनोगत व्यक्त केले .
सूत्र संचालन
प्रा.अलका भटकर यांनी केले,
तर आभार प्रदर्शन हिरकणी महिला मंच च्या अध्यक्ष सौ. सुवर्णा इंगळे व सचिव बबिता सिंग यांनी केले,
पांडुरंग टॉकीजच्या मागे
श्री बालाजी मंदिर हॉल
टिम्बर मार्केट येथे
रविवार दीनांक 24 रोजी दुपारी 2 ते 5 यावेळेत सदर कार्यक्रम संपन्न झाला .
यशस्विते करीता
उमेंद्र पी वाघचौरे, अध्यक्ष आर्या फाउंडेशन डॉ. वंदना वाघचौरे
संचालिका आर्या फाउंडेशन
सुधाकर संणसे ,
प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हली
सेक्रेटरी प्रा, संजय भटकर,
प्रा,समाधान जाधव, adv, मुकेश अग्रवाल , प्रा,जीवन महाजन, प्रा,योगेश इंगळे, सुनील वानखेड़े, प्रा,प्रदीप सोनवणे, आणि सम्पूर्ण रोटरी क्लब ऑफ़ तापी व्हेली ग्रुप.तसेच हिरकणी महिला मंच च्या adv मनीषा बाविस्कर, पोर्णिमा मासाने,सरोजिनी रामटेके, मोनिका डॅनियल आणि सम्पूर्ण हिरकणी महिला मंच टीम यांनी परिश्रम घेतले,
या कार्यक्रमात सौ, छाया चौधरी, सौ मालती येवले, राजेश्री सोनवणे, रोजबेल धामणे, राजेश्री सुरवाडे,
यांनी विशेष सहकार्य केले
तसेच महानंदा पाटील ,वैशाली सपकाळे, कविता सुशीर, कक्षिश गोगिय, सीमा जवरे,रक्षा भालेराव, इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती



