मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या


मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या खाली दिलेल्या तपशिलानुसार चालविणार आहे:
*०११३१ डाउन सुपरफास्ट विशेष दिनांक १.२.२०२१ पासून दादर येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी २१.४५ वाजता सुटेल आणि सायनगर शिर्डीला दुसर्‍या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
डाउन थांबे:
ठाणे,कल्याण,नाशिकरोड-००.४७/००.५०,
मनमाड-०१.४५/०१.५०,कोपरगाव.
*०११३२ अप सुपरफास्ट विशेष दिनांक २.२.२०२१ पासून साईनगर शिर्डी येथून दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी २२.२५ वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल.
*अप थांबे:कोपरगाव,मनमाड-२३.४०/२३.५५,
नाशिक-००.५२/००.५५ ,कल्याण,ठाणे
संरचनाः १ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, २ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ७ शयनयान आणि ७ द्वितीय श्रेणी आसन
*आरक्षण: पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी क्र.०११३१/०११३२ साठी आरक्षण सामान्य भाडे दराने दिनांक २७.१.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला
भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *