पाच, दहा व शंभर रुपयांच्या नोटा बंद होणार ; रीझर्व्ह बँक मार्च-एप्रिलमध्ये निर्णय घेण्याची शक्यता


नवी दिल्ली –
पाच, दहा व शंभर रुपयांच्या चलनी नोटा मार्च वा एप्रिल महिन्यानंतर चलनात राहणार नसून या संदर्भात रीझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे तसेच या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.
नवीन नोटा यापूर्वीच चलनात
रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या माहितीनुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर पडतील. कारण या नोटा परत घेण्याची योजना आहे. नवीन नोटा आधीपासूनच चलनात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रीझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होत मात्र नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. तर सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील, असं आरबीआयने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *