भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे साइकलिंग स्पर्धेचे आयोजन”


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नागरीकांना सायकलिंगचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देश्याने भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे या वर्षीपासून (BSARA Paal Ultra Hill Cycling Challenge) बसारा पाल अल्ट्रा हिल साइकलिंग चॅलेंजचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती

असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण फालक यांनी दिली.
शहरातील नागरीकांना सायकलिंगचा अधिकाधिक सराव व्हावा हा यामागील हेतू असून ही स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी ५० किमी व १०० किमी या दोन गटात होणार आहे ५० किमी साठी भुसावळ ते खिरोदा व परत भुसावळ तर १०० किमी साठी भुसावळ ते पाल व परत भुसावळ असा आव्हानात्मक मार्ग
असेल . सहभागी स्पर्धकास
नावनोंदणी फी ३०० रूपये असेल. यशस्वी सहभागी स्पर्धकास पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचेही फालक यांनी सांगितले .
येथील सुशिलाबाई नामदेव फालक विद्यालयात शुक्रवार 22 रोजी आयोजित पत्रकार
परिषदेत माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला, प्रवीण पाटील, डाॅ. तुषार पाटील, डाॅ. निलीमा नेहेते, डाॅ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, रणजित खरारे, प्रवीण वारके अादी उपस्थित हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *