भुसावळ (प्रतिनिधी )- मिशन फिट भुसावळ हा उद्देश् डोळ्यासमोर ठेवून 8 मार्च
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर भुसावळ स्पाेर्टस अॅन्ड असाेशिएशनतर्फे शहरात यंदा सात मार्चला महिलांसाठी रनचे अायाेजन करण्यात अाले अाहे.मागील वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी देखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रविवार ७ मार्च रोज़ी आयोजन करण्यात आले आहे मात्र यंदा
काेराेनाच्या पार्श्वभुमीवर मर्यादित महिलांनाच प्रवेश दिला जाणार अाहे.
तीन, पाच व दहा किमी अंतरासाठी रनचे अायाेजन
केले अाहे. अशी माहिती शुक्रवार दिनांक 22 रोजी अायाेजीत पत्रकार परिषदेत डाॅ. निलीमा
नेहेते व डाॅ. चारूलता पाटील यांनी दिली.
येथील सुशिलाबाई नामदेव फालक विद्यालयात शुक्रवार रोजी आयोजित पत्रकार
परिषदेत माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला भुसावळ स्पाेर्टस अॅन्ड असाेशिएशनचे
अध्यक्ष प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डाॅ. तुषार पाटील, डाॅ. निलीमा नेहेते, डाॅ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, रणजित खरारे, प्रवीण वारके अादी उपस्थित हाेते.
. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर
मैदानापासून रनला सुरूवात होणार अाहे. यात तीन, पाच व दहा कीमी अंतर रन होणार अाहे. यंदा काेराेनाच्या पार्श्वभुमीवर
यावेळी मर्यादित महिलांना प्रवेश देता येईल व उर्वरित सहभागी महिलांना व्हर्चुअल पध्दतीने सहभाग नोंदविता येईल.
यामध्ये तीन, पाच व दहा या तिन्ही की . मी . साठी
प्रत्येकी २०० जणांना असा ६०० महिलांना प्रवेश दिला जाणार अाहे. या वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून नावनोंदणी
२६ जानेवारीपासून अाॅन लाईन केली जाणार अाहे. यासाठी सहभागी स्पधॅकांना प्रमाणपत्र, मेडल अाणि
टीशर्ट दिला जाणार अाहे. यासाठी फक्त ३०० रूपये शुल्क अाकारण्यात आली असून
सात मार्च पर्यत जर शहरातील रस्त्यातील खड्डे बुजविले गेले नाही तर धावण्याच्या
मार्गात बदल करण्यात येईल पर्यंायी मार्ग हा डाॅ. अांबेडकर मैदान ते अायुध निर्माणी पर्यतचा राहणार अाहे. अन्यथा डाॅ. अांबेडकर मैदान ते नहाटा
काॅलेज हा मार्ग असेल, १० कीमीसाठी महिला रर्नसला गेल्यावर
अर्धातासाच्या अंतराने पाच व नंतर तीन कीमी अंतराच्या स्पर्धेतील
महिलांना साेडले जाणार अाहे.
भुसावळ स्पाेर्टस अॅन्ड असाेशिएशनतर्फे अायाेजीत करण्यात येत असलेले
रन म्हणजे मिशन फिट भुसावळ अाहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रत्यके रनर्सने ताेंडाला मास्क लावणे आवश्यक आहे
, मास्क नसलेल्यांना मैदानावरच येऊ दिले जाणार नाही, ताेंडाला
मास्क असलेल्यांनाच प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली .



