भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जामनेर रोड वरील हाॅटेल मल्हारच्या शेजारी असलेल्या
भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेच्या कार्यालयात समुपदेशन कक्षाचे उद्घाटन प्रिन्सिपल डाॅ. मिनाक्षी वायकोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुटुंब नायक रमेश विठू पाटील होते.
सर्व प्रथम अध्यक्ष रमेश विठू पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी केले. डाॅ. मिनाक्षी वायकोळे यांचे स्वागत उपक्रम प्रमुख सौ. आरती चौधरी यांनी केले.
या समुपदेशनच्या कक्षाच्या चेअरमन म्हणून एकमुखाने निवड झाल्याबद्दल सौ. आरती चौधरी यांचा पंचायत मार्फत डाॅ. वर्षां कोळंबे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भोळे काॅलेजचे प्रिन्सिपल डॉ. आर पी फालक सर यांचे स्वागत अॅड. प्रकाश पाटील यांनी केले.
भुसावळ शाखेचे सचिव डाॅ. बाळू पाटील यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून समर्पक शब्दात सुत्रसंचलन केले.
उपक्रमांबद्दल माहिती देउन सौ. आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सांगितले की समुपदेशनचा मुलामुलींना फायदा होत आहे हे लक्षात आल्यामुळेच आज हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत व विशेषतः काही दिवसांमधे लाॅकडाउन मधे कौटुंबिक कलहा प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्या मुळे हे सेंटर सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी आजकाल अगदी क्षुल्लक कारणावरून मुलंमुली घटस्फोटापर्यंत पोहोचतात हे सांगून आम्ही शाळांमधे जाउन मुलामुलींचे शिबिर घेण्याचा मानस बोलून दाखवला.
आपल्या भाषणात डॉ. मिनाक्षी वायकोळे यांनी सांगितले की कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे आणि भोरगाव लेवा पंचायतीने उचललेल्या पावला मुळे ही कुटुंब व्यवस्था मजबूत होऊन समाज व पर्यायाने देश मजबूत होण्यास हातभार लागेल. व या उपक्रमा बद्दल सर्व पंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी आपले अनुभव सांगून मुलामुलीच्या बदलेल्या मानसिकतेला आईवडील जबाबदार असून शैक्षणिक तफावत सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले. व सौ. आरती चौधरी यांना समुपदेशनात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सदैव तयार असल्याचे सांगितले.
आभार प्रदर्शन सौ. आरती चौधरी यांनी केले व उपस्थित मान्यवरांकडून भविष्यात सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. या प्रसंगी पंचायतीचे जयश्री चौधरी, सुहास चौधरी, श्री. अजय भोळे, श्री. महेश फालक, निळूभाउ फालक, शरद फेगडे, दिगंबर महाजन ,परिक्षित ब-हाटे हजर होते. सौ. ईंदूताई पाटील
डॉ. सौ. वर्षा कोळंबे, डॉ संज्योत पाटील, इनरव्हीलच्या अध्यक्षा मोना भंगाळे, सौ. सुनीता पाचपांडे, प्राची राणे, प्रा. उज्ज्वला राणे उपस्थित होत्या
तसेच लेवा शहर अध्यक्ष देवा वाणी, राजेश चौधरी, शाम भारंबे, मनोज जावळे शुभम चौधरी उपस्थित होते.



