भुसावळ (प्रतिनिधी )-
जैन मुनीजी प.पू.आचार्य शिवमुनीजी महाराज यांचे आज्ञानुवर्ती प्रज्ञामहर्षि प.पू.युवाचार्यजी महेंद्रऋषीजी म.सा.यांच्यासह प.पू.उपप्रवर्तक अक्षयऋषीजी म.सा., प.पू.डॉ.अचलऋषीजी म.सा.आदी ठाणे पाच यांचे शहरातील सुराणा साधना भवनात रविवारी सकाळी आगमन झाले आहे. सोमवार, 14 डिसेंबरपासून मातृभूमी चौकातील संतोषी माता हॉलमध्ये सकाळी साडेआठ ते एक दरम्यान धार्मिक चर्चासत्र होणार असून गुरूदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघपती सुगनचंदजी सुराणा, ज्येष्ठ श्रावक प्रेमचंदजी कोटेचा, जे.बी.कोटेचा, गौतम चोरडीया, अतुल ताथेड, कांतीलाल चोरडीया आदींनी केले आहे.



