मराठी उद्योजकांना जगभरात व्यवसाय वाढविण्याची संधी – फडणीस ; सॅटर्डे क्लबच्या भुसावळ चॅप्टरचा पदग्रहण समारंभ उत्साहात ;

भुसावळ, (प्रतिनिधी)- मराठी उद्योजकांना आपला व्यवसाय जगभरात वाढविण्याची संधी सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मिळु शकते. असे मत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस सुहास फडणीस यांनी व्यक्त केले. क्लबच्या भुसावळ चॅप्टरच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तसेच स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लि.चे दीपक चौधरी, सी.ओ.ए.चे  व्ही.पी. कुलकर्णी, एससीजीटीचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल पिंपळकर, रिजनल हेड अभिजीत पाटील, डेप्युटी रिजनल हेड  दीपक पाटील, जळगावच्या छबी इलेक्ट्रिकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर छबीराज राणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‌ फडणीस पुढे म्हणाले की गाव तिथे सॅटर्डे क्लब हे आमचे ध्येय आहेच शिवाय जगभरात जिथे जिथे मराठी उद्योजक आहे तिथे तिथे सॅटर्डे क्लब स्थापन केला जाणार आहे. सध्या अबुधाबी व दुबई मध्ये सॅटर्डे क्लब सुरू आहे. सध्या क्लबचे एकुण २२४ चॅप्टर असुन त्यात आठ हजार ३८० सदस्य आहेत. ही संख्या येत्या दिवाळी पर्यंत दहा हजार नेण्याचा मानस आहे. हे उद्योजक एकत्रितपणे लक्ष्मीपुजन करतील. क्लबच्या माध्यमातून मराठी उद्योजकांचा सरकारवर प्रभावी सकारात्मक दबाव गट निर्माण करण्याचाही उद्देश आहे. सॅटर्डे क्लब हा सदस्यांचा व्यवसाय वाढविण्याच निर्माण झाला आहे असे फडणीस म्हणाले. अमोल पिंपळेकर म्हणाले क्लबच्या माध्यमातून एक हजार ३४ कोटीचा व्यवहार झाला आहे. क्लब मध्ये एकच जात असते ती म्हणजे व्यवसायीकांची जात होय. युनिटी फॉर बिझनेस ही आमची यंदाची थिम आहे. सध्या क्लब प्रचंड वेगाने वाढत आहे असे पिंपळकर म्हणाले. दिपक चौधरी यांचे देखील भाषण झाले. याप्रसंगी भुसावळ चॅप्टरचे नुतन अध्यक्ष दिपेश सोनार, सचिव कुणाल महाजन, कोषाध्यक्ष सी.ए. रोहित कोलते यांनी पदभार स्वीकारला. फडणीस यांनी त्यांना तसेच नवीन सदस्यांना सदस्यत्वाची पीन दिली. 
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नागरी विकास भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच मोस्ट अॅक्टिव्ह मेंबर म्हणून भरत सोनवणे, मंगला पाटील, राजेश चौधरी, उज्वल सराफ यांना सन्मानित करण्यात आले. टि.व्ही. मालिका कलावंत आशिष कुलकर्णी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच भुसावळ चॅप्टर सदस्यांच्या डिरेक्टरीचे फडणीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.मावळते अध्यक्ष चेतन पाटील यांनी अहवाल वाचन तर अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. रोहित कोलते, तन्मय जोशी, भरत सोनवणे, मंगला पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उज्वल सराफ यांनी सुत्रसंचलन केले तर रोहित कोलते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सावदा व जळगाव चॅप्टरचे सदस्य देखील उपस्थित होते.


-फोटो ओळी :
भुसावळ : सॅटर्डे क्लबच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस सुहास फडणीस, अमोल पिंपळेकर, अभिजित पाटील, दिपक पाटील, व्ही.पी. कुलकर्णी, दिपेश सोनार व सदस्य