भुसावळ शहर तेली समाजातर्फे १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

दहावी, बारावी, पदवी व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी १३ ऑगस्टपर्यंत मार्कशीट व नाव वार्ड कार्यकारिणी सदस्यांकडे जमा करण्याचे आवाहन ; 

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहर तेली समाजाच्या वतीने यावर्षी भुसावळ शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये यावर्षी दहावी, बारावी, पदवी तसेच डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याची मार्कशीट व विद्यार्थ्याचे नाव १३ ऑगस्टपर्यंत आपल्या वार्डातील तेली समाजाच्या कार्यकारिणी सदस्यांकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच समाजाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आपापल्या वार्डातील दहावी, बारावी, पदवी व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून संबंधित विद्यार्थ्यांचा या गुणगौरव सोहळ्यात समावेश होईल याची दक्षता घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आवश्यक माहिती वेळेत जमा करावी, असे आवाहन भुसावळ शहर तेली समाजाचे अध्यक्ष संजय श्रावण चौधरी यांनी केले आहे.