जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाजातर्फे भुसावळ येथे आषाढी पूजन उत्साहात संपन्न :

भुसावळ  (प्रतिनिधी ) - जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज, भुसावळ यांच्या वतीने आषाढी पूजनाचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. समाजातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमानिमित्त दुपारी २ वाजता शिवाजीनगर ते रामायणनगर या मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतल्याने वातावरण भक्तिमय झाले होते.
या धार्मिक सोहळ्यासाठी भटू येथून पोतराजांना आमंत्रित करण्यात आले होते. पोतराजांच्या पारंपरिक सादरीकरणासह धार्मिक विधी आणि आरफ वनाचे खेळ सादर करण्यात आले. या कार्यक्रमामुळे समाजाची सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाजाच्या वतीने करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी आषाढी पूजन करून समाजाच्या प्रगतीसाठी, ऐक्यासाठी तसेच सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यावेळी समाजाचे अध्यक्ष सुरेश वाघमारे, सचिव गोपाल म्याद्रे, कोषाध्यक्ष देवेंद्र पोंगल्लू, गीता एन्नेकर, शोभा एन्नेकर, ज्योती पोंगल्लू, चंदा भंडारी, विजया म्याद्रे, रेखा भंडारी, दिव्या भंडारी, जयचंद दीपक भंडारी, सुनील बाबू तल्लारे, कुणाल रामस्वामी ऐनमेकर, गणेश बत्तुल, विजय पुल्लीगिरी, तुषार सुरे, सोनू गणकर, हरीश पुल्लेवार, मनीष ऐनमेकर, हरीश बत्तुल, आदित्य बारले, हेमंत मेलेल्यु यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परंपरांचे जतन होत असल्याची भावना व्यक्त केली.