भुसावळ (प्रतिनिधी): भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण), 376 (बलात्कार) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची जिल्हा न्यायाधीश-3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष फास्ट ट्रॅक न्यायालय, जळगाव यांनी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचे नमूद करत त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने डेप्युटी चीफ ॲडव्होकेट अॅड. मंजुला के. मुंदडा (जळगाव) यांनी कामकाज पाहिले. बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.


