भुसावळ (प्रतिनिधी): येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या नीना कटलर,उपप्राचार्या श्रद्धाली घुले,समन्वयक हर्षला पाटील,चित्रकला शिक्षक मुकेश कोळी यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.यानंतर संगीत शिक्षिका प्रीती देशपांडे आणि महेंद्र सूर्यवंशी यांनी सरस्वती वंदना सादर केली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्राचार्या नीना कटलर व सर्व शिक्षकांना टिळा लावला,तसेच पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुमहिमेवर आधारित उत्कृष्ट भाषणे,नृत्य,कविता वाचन आणि घोषणाबाजी केली.तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरुकुल पाठशाळा या नाटिकेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शिक्षिका शीतल बुला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून प्राचीन गुरुशिष्य परंपरा आणि महर्षी वेदव्यास यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिस्त,कृतज्ञता आणि संस्कार हेच खरे शिक्षण: प्राचार्या नीना कटलर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या नीना कटलर म्हणाल्या की गुरु हेच आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. आयुष्यात शिस्त,कृतज्ञता आणि चांगले संस्कार जपणे हेच खरे शिक्षण आहे. त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालण्याचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा काकडे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार जयश्री मोरेस्कर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन - भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुकुल पाठशाळा नाटिकेने सादरीकरण करताना विद्यार्थी तर उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर व इतर शिक्षिका.


