भुसावळ (प्रतिनिधी)- येथील मातृभूमी चौक परिसरातील सुराणा साधना भवन येथे गुरुवार, दि. २३ जुलै रोजी जैन गुरुमाऊलींचे भव्य मंगल आगमन व प्रवेश होणार आहे. भुसावळ येथे जैन गुरुमाऊली प.पू. सम्यक दर्शनाजी म. सा. आदि ठाणे तीन यांचे दि २३ जुलैला सकाळी ९:३० वाजता ओसवाल पंचायत भवन पासुन सुराणा साधना भवनात १०.३५ ला मंगल पदार्पण होणार आहे. या चातुर्मास काळा निमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचन व दैनंदिन कार्यक्रम पत्रिका:सकाळी ९ ते १० वा: बुधवार दि २९ जुलै पासून दररोज सकाळी नियमित प्रवचन सुरू होईल. दुपारी २ ते ४ वा.: महिला व भगिनींसाठी दररोज विशेष धार्मिक चर्चा व मार्गदर्शन होईल. सायंकाळी: सामूहिक प्रतिक्रमण संपन्न होईल.या मंगल प्रसंगी सर्व भाविकांनी प्रवचन,धार्मिक चर्चा आणि संत दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा,जे.बी.कोटेचा,अतुल ताथेड,जयंतीलाल सुराणा आदिंसह श्री संघाने केले आहे.


