भुसावळ (प्रतिनिधी )- दि. ५ जुलै : भुसावळ येथे आज दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चैतन्य आयुर्वेद रुग्णालयात बीएलए-२ (BLA-2) पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेले ॲड. मोहतेशाम रजा आणि ॲड. शहेबाज खान यांनी मार्गदर्शन करत सविस्तर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी हे होते. तसेच बीएलए-१ चे अध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून योगेंद्र सिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांनी उपस्थितांना संबोधित करत संघटनात्मक कार्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष (अल्पसंख्याक) मो. मुनव्वर खान, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, इस्माईल पहिलेवान, यासमीन बानो, प्रदीप नेहेते, शैलेश ननवरे, नगरसेवक अहमद कुरेशी, महेबूब खान, पवन बैठणे, अशफाक काझी, नितीन पाटील, सुधाकर भडगुजर, विजय तुरकुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान बीएलए-२ पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेमधील भूमिका आणि संघटन बळकटीकरणाबाबत सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


