जळगाव जिल्ह्यातील बॉक्सिंगच्या विकासासाठी 14 जून रोजी महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच बॉक्सिंग क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक रविवार, दि. 14 जून 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता सुगोकी लॉन्स, पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे होणार आहे.

बैठकीत जिल्ह्यातील बॉक्सिंग असोसिएशन, विविध बॉक्सिंग क्लब, खेळाडू, प्रशिक्षक, बॉक्सिंगप्रेमी तसेच बॉक्सिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व घटकांच्या हितासंबंधी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाचा अधिक व्यापक प्रसार आणि प्रगती साधण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय होणार आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व बॉक्सिंग क्लबचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि बॉक्सिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या बैठकीस वेळेत उपस्थित राहून आपले मत व सूचना मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.