भुसावळ ( प्रतिनिधी) – सध्याच्या युगात मुले, मुली आणि महिला सशक्त होणे ही काळाची गरज असुन याकरिता ‘चला शिवरायांची युद्धकला आत्मसात करूया’, याअंतर्गत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबीर दि.६ ते १४ जून २०२६ या कालावधीत सकाळी व संध्याकाळी ६.०० ते ८.०० वाजेदरम्यान येथील संतोषी माता हॉल शेजारील जय मातृभूमी क्रीडा मैदानावर होणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात भारतीय व्यायाम प्रकार-दंड, बैठक शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला यासह मुली व महिलांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंपासून स्वसंरक्षण. मुलांच्या अभ्यासात एकाग्रता ताटाती यासाठी भारतीय बौद्धिक संस्कृतीवर, रामायण, महाभारत, शिवराय आणि त्यांचे मावळे तसेच क्रांतिकारक यांच्या जीवन चरित्रावर आधारित चिंतन असे बरेच काही प्रकार शिकविले जाणारे आहेत. या प्रशिक्षण शिबीरासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार असून वयाची अट ६ ते ६० अशी राहणार आहे. शिबीरात मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष खैरे गुरुजी (रायगड) हे असून सर्व प्रशिक्षणाचा लाभ भक्ती शक्ती युद्धकला प्रशिक्षण संस्कृती संवर्धन, जळगाव या संस्थेच्या कुशल शिक्षकांकडून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी वरुण इंगळे ९९६०८२४५००, शुभम रूमकर ७८८७७७९६०९, अंकित सोनवणे, अनिकेत साळी, एकांशू पाटील, भूषण महाजन यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त मुले, मुली व महिलांनी याप्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांनी केले आहे


