वरणगावात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तीव्र आंदोलन

वरणगाव (प्रतिनिधी ) – देशात आणि राज्यात सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

“महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मराठे, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा तावडे, शहराध्यक्ष प्रा. राहुल जोहरे, युवा अध्यक्ष कुलदीप देशमुख, नगरसेवक नाना चौधरी, इरफान सय्यद, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रा. मनोज देशमुख, शिवसेना शहराध्यक्ष सुनील भोई, काँग्रेस शहराध्यक्ष अशपाक काझी, जुनेद शाह, जिशान खान, डॉ. एहसान, शोएब खाटिक, दीपक निळे, अशोक पाटील, सचिन पाटील, जितू तावडे, मनोज दिनकरराव देशमुख, आयुष पाटील, शाहरुख खान, अब्दुल हुसेन, बबलू राजहंस, राहुल देशमुख, कुलदीप मुकुतराव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.