नालेसफाईच्या मागणीसाठी नगरसेविका आलेमा बानो कुरेशी यांचे निवेदन

भुसावळ( प्रतिनिधी ): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या नगरसेविका श्रीमती आलेमा बानो इब्राहीम कुरेशी यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील आगाखान बाडा, शिवाजी नगर आणि नसरवांजी फाईल परिसरातील नाल्यांची तातडीने सफाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले.

नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी परवेज यांची भेट घेऊन परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी लवकरच नालेसफाईचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या प्रसंगी काँग्रेसचे माजी नगरसेवक अहमद इब्राहीम कुरेशी, प्रदेश सचिव प्रवीण भाऊ सुर्वाडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान तसेच इस्माईल पहलवान माजी युवक अध्यक्ष उपस्थित होते.