भारतीय बौद्ध महासभेच्या यावल तालुका कार्यकारिणीची निवड

भुसावळ (प्रतिनिधी )- सम्राट बुद्ध विहार, फैजपूर ता. यावल येथे भारतीय बौद्ध महासभेच्या यावल तालुका नवीन कार्यकारिणीचे 15 मे 2026 रोजी पुनर्गठन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यानंतर बौद्धाचार्य महाले गुरुजी यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे होते.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रा. संजीवकुमार साळवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेश साळवे, जिल्हा संस्कार सचिव संघरत्न दामोदर, जिल्हा संघटक विजय अवसरमल, वसुंधराताई मेढे तसेच पारमिता महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई शैलेश मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत भारतीय बौद्ध महासभेच्या यावल तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. त्यानुसार बी. डी. महाले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्षपदी विष्णू मेश्राम, उपाध्यक्ष (पर्यटन प्रचार) भागवत पटाईत, उपाध्यक्ष संरक्षण विभाग समता सैनिक दल ज्ञानेश्वर अडकमोल, हिशोब तपासणीस विलास तायडे, कार्यालयीन सचिव चेतन केदारे यांची निवड करण्यात आली.

याशिवाय महेंद्र भालेराव, संगीत भालेराव, विलास सपकाळे, वैभव तायडे, संरक्षण सचिव बबन धोंडू तायडे, हरी आमोदकर, देविदास साळुंखे, रोशन केदारे, रुद्रा खंदारे व शरद तायडे यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्म उपासिका सुमन दिलीप मेढे, मालताबाई प्रकाश मेढे, रेखा आकाश मेढे व चंद्रकला सुपडू मेढे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व सरणत्तय घेऊन करण्यात आली.