भुसावळ (प्रतिनिधी) – परिवहन विभागात मेस्को महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सविता सखाराम माळी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महिला सुरक्षा संदर्भात आपल्या परिवहन खात्याकडून ठोस पावले उचलण्यात यावी. जळगाव जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात एस.टी. डेपो मध्ये चोरी प्रकार, छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. तरी महिला व मुलीच्या सुरक्षेसाठी मेस्को सुरक्षा रक्षक महिला/पुरुष नेमण्यात यावे. मेस्को सुरक्षा रक्षक मध्ये माजी सैनिक व मेस्को ट्रेनिंग केलेले सिव्हीलन महिला/पुरुष प्रत्येक तालुक्यात डेपो मध्ये नेमण्यात यावे. जेणेकरुन महिलांची सुरक्षा वाढण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

←


