भुसावळात सहदुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन इमारत सज्ज :

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील जळगाव रोडवरीलतहसील कार्यालय परिसरात सहदुय्यम निबंधक कार्यालयासाठी नवीन प्रशस्त आणि अत्याधुनिक इमारत पूर्ण झाली असून लवकरच येथे जमीन खरेदी-विक्री दस्त नोंदणीचे कामकाज सुरू होणार आहे. या नवीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि गतिमान सेवा मिळणार आहे.

जुन्या कार्यालयात जागेची कमतरता आणि वाढती गर्दी यामुळे अनेकदा नागरिकांना ताटकळत राहावे लागत होते. मात्र, आता आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या नव्या इमारतीमुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाला लागूनच ही इमारत असल्याने महसूल व नोंदणीशी संबंधित कामे एकाच ठिकाणी करणे सोपे होणार आहे.