बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष तसेच गुन्हेगारांवर वचक असलेले अधिकारी म्हणून परिचित असलेले पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवक परिवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भुसावळ तसेच सर्व धारकरी परिवार यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर व प्रयत्नशील असलेले अधिकारी म्हणून राहुल वाघ यांच्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. तसेच गोरक्षणासाठी गोसेवकांना सहकार्य करणारे जबाबदार अधिकारी म्हणूनही त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले

यावेळी पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे शुभम रुमकर, अनिकेत साळी, अतुल गोसावी, मोहित बडगुजर, वैभव वाघे, भावेश नेमाडे, प्रणय भागवत आदी उपस्थित होते.