भुसावळ विभागात श्री राजू सोनवणे यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार :

भुसावळ (प्रतिनिधी)-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कर्मचारी राजू सोनवणे यांनी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतल्याने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डी.आर.एम.) पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते सोनवणे यांना सन्मानचिन्ह व चेक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ए.डी.आर.एम.) मीना यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमुख नंदाताई प्रकाश निकम आणि समाजसेवक प्रकाश निकम यांनीही उपस्थित राहून सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी मान्यवरांनी सोनवणे यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात रेल्वे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.