भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी होणार उद्या; पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मांडणी; २० एप्रिलला भाकीत :

भुसावळ, (प्रतिनिधी) – संपूर्ण विदर्भ त्याचप्रमाणे जळगाव (खान्देश) जिल्ह्यामध्ये विदर्भातील जळगाव जामोद येथे पीकस्थिती, पावसाचे प्रमाण तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तविणारी भेंडवड येथील पारंपरिक घटमांडणी यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पार पडणार आहे. या मांडणीद्वारे पावसाचे भाकीत काय येणार, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीकस्थिती, आर्थिक व राजकीय परिस्थिती तसेच विविध संकटांबाबत अंदाज वर्तविले जातात. त्यामुळे या म ांडणीबाबत मोठी उत्सुकता असते.

अशी केली जाते घटमांडणी गावाबाहेरील शेतात घट मांडले जातात. त्यामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ आदी अठरा प्रकारचेधान्य ठेवले जाते. मध्यभागी मातीची ढेकळे व त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते. पान-सुपारी व विविध खाद्यपदार्थही ठेवले जातात. रात्रभर कोणीही त्या ठिकाणी थांबत नाही. दुसऱ्या दिवशी झालेल्या बदलांवरून भाकीत वर्तविले जाते. दरवर्षी हजारो शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित राहून हे भाकीत ऐकतात. हवामान खात्याच्या अंदाजांनंतरही या पारंपरिक मांडणीचे महत्त्व कायम आहे.

अक्षयतृतीयेच्या दिवशी होणार मांडणी!

म्हणजेच १९ एप्रिल रोजी संध्याकाळी घटमांडणी जाणार आहे. त्यानंतर २० एप्रिल रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते भाकीत जाहीर केले जाईल.