भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ओझरखेडा येथे बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात आली. लोकसहभागातून गावाच्या साफसफाई अभियानाला सुरुवात करण्यात आली. जयंतीला केवळ उत्सवी स्वरूप न देता प्रा उत्तम सुरवाडे, रोशन सुरवाडे, यांनी आई कमलाबाई सुरवाडे, भाऊ रवींद्र सुरवाडे यांच्या स्मरणार्थ सरपंच दिलीप सुरवाडे यांच्या नियोजनाखाली गावकऱ्यांना तथागत भगवान गौतम बुद्ध ची आकर्षक मूर्ती सप्रेम भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
गावकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा ,उत्तम ठिकाणी आणि वेळच्यावेळी मिळाव्या, म्हणून सरपंच दिलीप सुरवाडे यांच्या सौजन्याने ॲम्बुलन्स चे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. उत्तम सुरवाडे यांच्या संकल्पनेतून गावातील स्मशानभूमीचं सुशोभीकरण, पूर्वजांच्या नावे वृक्ष लागवड करून करून स्मृती उद्यान विकसित केले जाणार आहे.लवकरच कामाला होत असल्याची माहिती समन्वयक प्रा उत्तम सुरवाडे यांनी दिली. याप्रसंगी अजय पाटील यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. प्रतिज्ञा संदीप सुरवाडे यांनी.समायोजित मनोगत व्यक्त केले. प्रा उत्तम सुरवाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका विशद केली. हा कार्यक्रम बौद्धाचार्य उत्तम चिंधू सुरवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व बुद्ध विहार समितीच्या सदस्यांकडे मूर्ती सुपूर्त करताना, गावचे सरपंच दिलीप सुरवाडे, ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य, रामभाऊ निळे, पांडुरंग पाटील, दिवान सिंह पाटील अतुल पाटील, गोलू भाऊ. फुलसिंग पाटील,, कालू निकाळजे, भीमराव सुरवाडे, पंडित बोदडे, राजू बोदडे.पोलीस पाटील, सुरवाडे परिवारातील गुंफाबाई सुरवाडे, मंगला सुरवाडे, रचना सुरवाडे, ज्योती सुरवाडे, संतोष सुरवाडे मीनाक्षी सुरवाडे प्रियंका सुरवाडे आकांक्षा सुरवाडे, बेबीताई बाविस्कर, सर्व सदस्य, गावकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



