16 वर्षीय मुलीवर 34 वर्षीय मावसाकडून लैंगिक अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना…!

जळगाव शहरातल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असलेल्या मावशीच्या पतीने अर्थात मावसाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.

गेल्या वर्षी 2025 च्या दिवाळी सणाच्या दरम्यान सदर पीडित अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी ही घरी एकटी असताना तिच्या 34 वर्षीय मावसाने तिच्यावर जबरदस्ती करत जिरे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. आणि हा प्रकार वेळोवेळी घडत राहिला. मात्र अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याच निष्पन्न झाल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी मुलीचा जबाब घेण्यात आला व तिच्यावर मावसाने अत्याचार केल्याचं सांगितलं.

याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या मावसाविरुद्ध पोक्सो कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यास अटक देखील करण्यात आली आहे. याविषयीचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करत आहेत.