निधन वार्ता: मुरलीधर उखर्डू मावळे

जळगाव – काळे वाडा, राम पेठ, दलाल वाड्या जवळ, जुने जळगाव येथील मुरलीधर उखर्डू मावळे (वय ७८) यांचे दि. १३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. ते दीपक मावळे यांचे वडील होत.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून (काळे वाडा, राम पेठ, दलाल वाड्या जवळ, जुने जळगाव) निघणार आहे.