भुसावळ (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाकडून राज्यभर सुरू करण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान यांनी भुसावळ विधानसभा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून 2002 सालच्या मतदार यादीच्या आधारे नावे पडताळणी व मॅपिंगचे काम सुरू आहे.
ज्या मतदारांनी अद्याप आपले नाव मतदार यादीत तपासले नाही किंवा मॅपिंग केलेले नाही, त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
या मोहिमेसाठी संपर्कासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे: नगरसेवक अहेमद कुरैशीप्रवीण सुरवाडे – प्रदेश सचिव , रहीम कुरैशी – जिल्हा सरचिटणीस सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


