एसआयआर मध्ये मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन – मो. मुनव्वर खान

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने भुसावळ विधानसभा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंना SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण राज्यभर मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन-तीन महिन्यांपासून भुसावल विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विभागाकडे 2002 सालची मतदार यादी उपलब्ध असून, ज्यांचे नाव अद्याप मॅपिंग झालेले नाही, अशा नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

  • मो. मुनव्वर खान (प्रदेश उपाध्यक्ष) – 8208552852
  • नगरसेवक अहमद कुरैशी – 9049421786
  • प्रवीण सुरवाडे (प्रदेश सचिव) – 9823235535
  • रहीम कुरैशी (जिल्हा सरचिटणीस) – 9860886630

सर्व मतदारांनी या विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.