भुसावळला कविता दिनानिमित्त ‘साहित्य मंथन’ उत्साहात : खानदेश साहित्य संघाचा उपक्रम : विद्यार्थी व ज्येष्ठांचे कविता सादरीकरण


भुसावळ, (प्रतिनिधी ) -: येथील खानदेश साहित्य संघाच्या शाखे तर्फे जागतिक कवीता दिनानिमित्त आयोजित ‘साहित्य मंथन’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी व ज्येष्ठ यांनी एकाच मंचावर स्वरचित कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
नाहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ.सदाशिव सूर्यवंशी होते.
यावेळी ज्येष्ठ लेखिका व कवी डॉ.सुषमा खानापूरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे व काव्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संघाचे जिल्हाध्यक्ष गझलकार शरद धनगर, जिल्हा सचिव उमेश काटे, सेवानिवृत्त शिक्षण मंडळ सचिव व कवी शशिकांत हिंगोणेकर, उद्योजिका मंगला पाटील, प्रा. संध्या महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ सुषमा खानापुरकर म्हणाल्या महर्षी वाल्मिक ऋषींनी जगातील पहिले काव्य लिहिल्याचे मानले जाते. भरपुर लिखाण करुनही आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्या कवितेच्या चार ओळीतुन व्यक्त करता येतात. कविता समजावी लागते, समजुन घ्यावी लागते व समजुन सांगावी लागते. नव्या पिढी पर्यंत कविता पोहचवायची असेल तर कवीतेचे रसग्रहण व भावार्थ सांगता आला पाहिजे. ही जबाबदारी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांची तशीच कवींची देखील आहे असे डॉ खानापूरकर म्हणाल्या.
प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी म्हणाले की साहित्याला कुठलाही जात, धर्म, पंथ नसतो. कविता सामान्य माणसा पर्यंत पोहचली पाहिजे. कवीतेतुन सामान्य माणसाचे जगणे उमटले पाहिजे. खानदेश साहित्य संघ हे साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ असून येथे नवोदितांना संधी व ज्येष्ठांना सन्मान दिला जातो असे त्यांनी सांगितले. उद्योजिका मंगला पाटील, स्वागताध्यक्ष श्रीकांत जोशी यांचेही यावेळी भाषण झाले. याप्रसंगी राजोरे (ता. यावल) येथील
एल.एम.पाटील विद्यालयातील बाल कवयित्री मुग्धा काळवीट (सिंधु आजी), हर्षता पाटील (चिव चिव चिमणी), निताली पाटील (माझी शाळा), गोपिका पाटील (आई),काव्या कोळी (आई-बाबा) यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. दुपारच्या सत्रात रेखा मराठे,रजनी पाटील,किशोर पाटील,नीलिमा नेहेते, राजेंद्र जावळे,वंदना ढाके,लीना अहिरे,ललिता टोके,संध्या भोळे, विनोद जाधव,विजय सूर्यवंशी, घनःश्याम सावरकर, जयश्री काळवीट यांनी उत्तमोत्तम कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. निवेदन लिना अहिरे यांनी केले.तसेच ज्येष्ठ साहित्यिक ललिता टोके यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.नितीन करमरकर व संध्या भोळे यांचे कथाकथन झाले. निवेदन वंदना ढाके यांनी केले. त्यानंतर शरद धनगर यांच्या अध्यक्षतेखाली मंजुषा पाठक,सुधीर महाजन, घनशाम सावरकर, आशा साळुंखे यांनी दर्जेदार गझल सादर करत रसिकांची दाद मिळवली. निवेदन आशा साळुंखे यांनी केले. समारोप सत्रात शशिकांत हिंगोणेकर, काशिनाथ भारंबे उर्फ निर्मोही, बालभारती मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.जगदीश पाटील,डॉ.मिलिंद धांडे,प्रा.संध्या महाजन, जयश्री काळवीट यांच्या हस्ते सर्व कवींचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शशिकांत हिंगोणेकर यांचे यावेळी भाषण झाले.कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.जगदीश पाटील,डॉ.मिलिंद धांडे, डॉ.नितीन करमरकर ,वंदना ढाके,लीना अहिरे,घनशाम सावरकर,राजेंद्र जावळे,संध्या भोळे ,अवधूत दामोदरे,नितीन तोडकर,जयश्री काळवीट यांनी परिश्रम घेतले.

—– फोटो ओळी ……
भुसावळ : खानदेश साहित्य संघा तर्फे आयोजित ‘साहित्य मंथन’ कार्यक्रमात स्वरचित कविता सादर करणाऱ्या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. सोबत शशिकांत हिंगोणेकर, डॉ सदाशिव सुर्यवंशी, शरद धनगर, उमेश काटे, डॉ सुषमा खानापुरकर, श्रीकांत जोशी आदी.