भुसावळात विश्वशांतीसाठी नवकार महामंत्राचा जप :

भुसावळ (प्रतिनिधी ) – मराठी नुतन वर्ष व गुढी पाडवा निमित्त भुसावळ शहरातील सुराणा साधना भवनात विश्वशांती व सर्वांना आरोग्य आयुष्य व यश लाभावे म्हणून नवकार महामंत्राचा जप प्रखर व्याख्याता व तपस्वीनी माता संयम प्रभाजी म सा व त्यांचे सहकाऱ्यांनी केला.
या प्रसंगी संघपती जयंतीलाल सुराणा,जे बी कोटेचा,गौतम चोरडिया,कांतीलाल चोरडिया,विनोद मेहेता,अतुल ताथेड,राजेश बाफना,राजेश मेहता,राजेश सुराणा,अशोक सुराणा,विजय चोरडिया,विशाल चोरडिया,सनी चोरडिया,मुकेश चोपडा,सुरेशचंद्र कुमट यांच्या सह अनेक जैन बांधव या वेळी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे विश्वशांतीसाठी व सर्वांना आरोग्य आयुष्य व यश लाभावे यासाठी जप करतांना प्रखर व्याख्याता व तपस्वीनी माता संयम प्रभाजी म सा व त्यांचे सहकारी दिसत आहे.