भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्रीमती पी.के.कोटेचा महिला महावीद्यालयाचे प्र.प्राचार्य , प्रख्यात समाजसेवक व गोसेवक,शेतकरी, जैन समाजातील सक्रिय कार्यकर्ते प्रा. डॉ.डि.एम.
ललवाणी यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय मानाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा रोवला गेला.

प्रा.ललवाणी यांनी अनेक वर्षांपासून समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत समाजाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळे, सामाजिक एकजूट वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच विविध जनजागृती मोहिमा यामधून त्यांनी समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य केले आहे.तसेच त्यांनी निव्रुत्तीनंतर धरतीमाता व गोमाता च्या सेवेला प्राधान्य देवुन ऊर्वरीत आयुष्य निसर्ग,जिवदया,मदतीचा हातभार , त्यांच्या या सातत्यपूर्ण व निःस्वार्थ सेवेमुळेच त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात येत आहे.
या पुरस्काराचे विशेष आकर्षण म्हणजे हा सन्मान महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठुरायाच्या पवित्र नगरीत ३१ मार्प्र रोजी पंढरपूरच्या पावन नगरीत प्रदान करण्यात येणार आहे. पंढरपूरच्या या आध्यात्मिक वातावरणात ललवाणी सरांचा होणारा गौरव हा त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. या पुर्वी सुध्दा अनेक राष्ट्रीव आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, मित्रपरिवार, नातेवाईक, समाजबांधव तसेच विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील तरुणांनीही समाजसेवेत पुढे यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.


