भुसावळमध्ये 20 वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसात मिसिंग नोंद

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील 20 वर्षीय तरुणी घरातून अचानक निघून गेल्याची घटना समोर आली असून याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती बसंत बनारसी (वय 20) ही 8 मार्च 2026 रोजी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

यानंतर तिची आई लक्ष्मी वसंत बनारसी यांनी 11 मार्च 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पार्वतीची उंची सुमारे 5 फूट 4 इंच आहे. तिचे केस काळे, लांब व मोठे आहेत. ती घरातून निघताना निळ्या रंगाचा कुर्ता आणि निळी पँट परिधान केलेली होती. तिच्या कपाळावर जखमेची खुण असून ती तिची ओळख पटविण्यास मदत करू शकते.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन करून पुढील संपर्क क्रमांकवर संपर्क साधावा.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे – 0252-222399
पोलीस निरीक्षक, भुसावळ पोलीस ठाणे – 9922276667
पो.कॉ. 1572 श्री कृष्णा पाटील – 8888675282