आव्हाने पेलणाऱ्या महिला जगाला सशक्त बनवतात – प्राचार्य डॉ. आर. पी. फालक


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधीन असणाऱ्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री. चंद्रकांत चौधरी, जळगाव जिल्हा संघटक आणि नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ. दयाघन राणे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तथा प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. पी. फालक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना श्री. चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की, आपल्या मानवी समाजाच्या विकासातील पहिली क्रांती अर्थात शेतीच्या शोधाची सुरुवात महिलांपासून झालेली असून त्या नंतर आज पर्यंत समाजकारण, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान महत्वाचे असल्यामुळे जगातील अनेक क्षेत्रामधील संदर्भच महिलांच्या योगदानामुळे बदलून गेले आहेत. म्हणून स्त्रियांच्या विकासविषयक योगदानाकडे नवीन दृष्टिकोनातून पहिले पाहिजे. तर प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींमध्ये असलेल्या मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या व्यसन आणि त्यांच्या महिला आणि लहान मुलींच्या शरीरावरील दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आणि जगात आव्हाने पेलणाऱ्या महिला जगाला सशक्त बनवतात असे सर्वत्र निदर्शनास आलेले आहे, म्हणून सशक्त महिला म्हणजेच सशक्त समाज हे सूत्र आता सर्वमान्य झालेले आहे असे मत व्यक्त केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री. चंद्रकांत चौधरी आणि प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांचे हस्ते महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका प्राध्यापक डॉ. जयश्री सरोदे, प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. निर्मला वानखेडे, प्रा. संगीता धर्माधिकारी, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. कामिनी चौधरी, प्रा. सुशीला भाटे, प्रा. अश्विनी भाग्यवंत, प्रा. गायत्री नेमाडे, प्रा. कुंदा पेंढारकर या प्राध्यापिकांसह कार्यक्रमाचे आयोजनात सहकार्य करणाऱ्या कु. कांचन पाटील आणि कु. आरती वराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी केले. प्रास्ताविक दरम्यान प्रा डॉ राणे यांनी नशाबंदी मंडळाच्या स्थापनेपासून “मतपरिवर्तनातून व्यसनमुक्तीकडे” या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत चौधरी यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांचे हस्ते या प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांचा सत्कार महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल सावळे यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी कु. कांचन पाटील, कु. आरती वराडे, प्रा. आर. डी भोळे, श्री. प्रकाश सावळे आणि श्री. सुनील ठोसर यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिद्धी प्रमुख प्रा. संजय चौधरी यांनी कळवले आहे.