भुसावळ,( प्रतिनिधी ): जागतिक महिला दिनानिमित्त जैन श्री श्रावक संघाच्या वतीने ज्येष्ठ महिला व तपस्विनी भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थितांनी ज्येष्ठ महिलांचे पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वादही घेतले.

या कार्यक्रमात कांताबाई सुराणा, निर्मलाबाई मेहता, राधाबाई चोरडिया, सुशिलाबाई चोरडिया, सजनबाई कुमट, सुमतीबाई नहार, डॉ. शीतल चोरडिया आणि आरती साखला यांसह अनेक ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, विनोद मेहता, डॉ. प्रमोद जैन, राजेश बाफना, विशाल चोरडिया, गौतम चोरडिया, जे. पी. चोरडिया, विजय चोरडिया यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
ज्येष्ठ महिला कांताबाई सुराणा यांचा सन्मान करताना जैन श्री श्रावक संघाचे कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, जयंतीलाल सुराणा, गौतम चोरडिया, विनोद मेहता, डॉ. प्रमोद जैन, विजय चोरडिया आदी.


