शिवमहापुराण कथा स्थळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयतर्फे सहस्र शिवलिंग दर्शन व आध्यात्मिक स्वरूपातील नाट्यप्रयोगांचे भव्य आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ इथून जवळच असलेल्या अकलूद जवळ सावदा फैजपूर रोडाला लागून असलेल्या जागेवर सुप्रसिद्ध असलेले शिव महापुराण कथा वाचक प्रदीप जी मिश्रा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 मार्च ते 16 मार्च करण्यात आलेले आहे त्याच परिसरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय सेवा केंद्र भुसावळ यांच्यातर्फे या ठिकाणी प्रदर्शनी अध्यात्मिक मनोरंजनात्मक खेळ यासोबतच सहस्र शिवलिंग दर्शन व इतरही कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे .मनःशांती साठीआत्मा आणि परमात्मा परमात्म्याचा अवतरण असे विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे या कार्यक्रमाची वेळ रोज संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत राहणार आहे .

शिवभक्तांनी तसेच इतरांनीही ड्रामा शिवप्रदर्शन यासोबतच सहस्त्र शिवलिंगदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे जाहीर आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका राजयोगिनी बी के सिंधू दीदी यांनी आवाहन केले आहे या कार्यक्रम प्रसंगी बीके ज्योती दीदी बीके कविता दीदी सोबतच नाना पाटील सर, अनिल भाई, भरत भाई, रितेश वारके, स्वप्निल भाई, महेश भाई, भागवत भाई ,कुकरेजा भाई , प्रभाकर भाई आधी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहेत . तरी नागरिकांनी माता-भगिनींनी सेवा केंद्र द्वारा आयोजित उपक्रमाला भेट द्यावी असे सर्वांतर्फे आवाहन करण्यात येत आहे