भुसावळ (प्रतिनिधी ) : येथील भुसावळ बार असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आरंभ II वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे सामने 28 फेब्रुवारीपासून रेल्वेच्या मैदानावर सुरू झाले. या स्पर्धेचे उद्घाटन रेल्वेचे डी.आर.एम. पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत भुसावळ, जळगाव आणि मुक्ताईनगर येथील वकील संघांच्या क्रिकेट टीमनी सहभाग घेतला. स्पर्धेत डिसूजा इलेव्हन क्रिकेट टीम, यादव इलेव्हन क्रिकेट टीम, सम्राट क्रिकेट टीम, भुसावळ बार असोसिएशनची आरंभ A क्रिकेट टीम, आरंभ B क्रिकेट टीम, लीगल मास्टर्स मुक्ताईनगर, किरण इलेव्हन जळगाव, भुसावळ कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम, जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम, महिलांची अशोका सम्राट क्रिकेट टीम आणि रॉयल चॅलेंजर्स भुसावळ (RCB) या संघांचा सहभाग होता.
3 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता अंतिम सामना भुसावळ वकील संघातील आरंभ A क्रिकेट टीम आणि जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम यांच्यात झाला. आरंभ क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दहा षटकांत आरंभ संघाने 74 धावा केल्या. यात दीपक वाघ यांनी सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीमकडून विनोद माचरे यांनी शानदार फलंदाजी करत 53 धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम विजेता ठरला, तर भुसावळ वकील संघातील आरंभ क्रिकेट टीम A उपविजेता ठरला.
अंतिम सामन्यात आरंभ टीमचे गोलंदाज अॅड. जावेद शेख आणि विजय निंभोरे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी म्हणून सुनील पगारे (यादव इलेव्हन क्रिकेट टीम), करण माने (जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम), अॅड. राहुल लहासे (लीगल मास्टर्स मुक्ताईनगर क्रिकेट टीम), अॅड. योगेश तायडे (आरंभ क्रिकेट टीम B, भुसावळ), अॅड. आदित्य पाटील (सेमी फायनल – आरंभ क्रिकेट टीम A, भुसावळ), विनोद माचरे (सेमी फायनल – जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम) आणि अंतिम सामन्यात विनोद माचरे (जळगाव कोर्ट स्टॉफ क्रिकेट टीम) यांना गौरविण्यात आले.
महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स भुसावळ (RCB) आणि अशोका सम्राट महिला क्रिकेट टीम यांच्यात सामना झाला. यात अॅड. कीर्ती सोनवणे (RCB) यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले आणि रॉयल चॅलेंजर्स भुसावळ संघ विजेता ठरला. तर अॅड. कृष्णा सिंग यांच्या नेतृत्वाखालील अशोका सम्राट महिला क्रिकेट टीम उपविजेता ठरली.
स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन म्हणून अॅड. आदित्य पाटील (आरंभ क्रिकेट टीम A), बेस्ट बॉलर म्हणून अॅड. जावेद शेख, मॅन ऑफ द सिरीज म्हणून अॅड. योगेश तायडे (आरंभ क्रिकेट टीम) आणि बेस्ट कॅचेससाठी दीपक वाघ यांना ट्रॉफी देण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. पी. ई. नेमाडे दादा, अॅड. एन. डी. चौधरी, अॅड. शशिकांत पाटील, अॅड. नरेंद्र महाजन, अॅड. प्रमोद वर्मा, अॅड. राजेश कोळी, अॅड. राकेश यादव आणि अॅड. सुशील बर्गे यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. आय. आय. खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. प्रफुल्ल पाटील यांनी केले. सामन्यांचे धावते समालोचन अॅड. रमेश पांडव यांनी केले.
या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आरंभ चषक समितीचे प्रमुख अॅड. तुषार पाटील यांच्यासह अॅड. धनराज मगर, अॅड. प्रफुल्ल पाटील, अॅड. धीरज शंकपाळ, अॅड. आलम मिर्झा, अॅड. उमेश पाटील, अॅड. प्रवीण कोळी, अॅड. अभिषेक पाल, अॅड. शुभम गोसावी, अॅड. आदित्य पाटील, अॅड. मनीष अहिरे, अॅड. अभिजीत ओक, अॅड. रवींद्र पाटील, कुणाल कचरे तसेच आरंभ समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


