जिवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार !

जळगाव (प्रतिनिधी ) – वेल्डींग काम करण्यासाठी आलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण करून तुला व तुझ्या वडिलांना मारुन टाकेल अशी धमकी देत पीडितेवर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७, याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्यचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी संशयित दीपक कोळी हा वेल्डींगचे काम करण्यासाठी गेला होता. त्याने पीडित मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेला तिच्यासह तिच्या वडीलांना मारुन टाकेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दि. २८ रोजी उघडकीस आल्यानंतर पीडितेने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानुसार कुटुंबियांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दीपक रतीलाल कोळी (वय २७, याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि साजीद मन्सूरी हे करीत आहे.