भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील जैन बांधवांतर्फे यंदाही धुलीवंदन निमित्त पर्यावरणपूरक ‘टिळा होळी’ साजरी करण्यात येणार आहे. दिनांक ३ मार्च, मंगळवार रोजी धुलीवंदनाच्या दिवशी एकमेकांना अबीर-गुलाल लावून सर्व मतभेद विसरून एकरूप होण्याचा संदेश देण्यात येणार आहे. प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.

या उपक्रमात निर्मल कोठारी, जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया, अतुल ताठेड, राजेश बाफना, भगवान जैन, विशाल चोरडिया, विनोद चोरडिया, प्रशांत बजाज, राकेश चोपडा, नवीन चोरडिया, सनी चोरडिया, संजय सुराणा, डॉ. सुदेश साखला, डॉ. मयूर चोरडिया, डॉ. प्रवीण चोरडिया, डॉ. प्रमोद जैन, शिरीष नाहाटा, विनोद मेहता, राजेश मेहता, आय. जी. नहार, सचिन कोटेचा, संदीप देवडा, अजय जैन, राजेश चोपडा, अजय कोटेचा, सुरेशचंद कुमट, राजू कोटेचा, संजय चिपळ यांच्यासह अन्य जैन बांधव सहभागी होणार आहेत.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.


