भुसावळ रेल्वे स्थानकावर दि.जैन यात्रेकरूंचे व व अनुमोदना समारोह

भुसावळ (प्रतिनिधी ) दि.जैन समाजाकडून,1008 यात्रेकरूंची स्पेशल ट्रेन चे भुसावळ मध्ये भव्य स्वागत सत्कार करण्यात आले.
विद्या समय संस्कार सेवा फाऊंडेशनचे, भुसावळ जैन समाज कडून कौतुक
सविस्तर,
आचार्य भगवन श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या द्वितीय समाधी दिनानिमित्त, विकमुंबई ते शिखरजी यात्रेचे विशेष वातानुकूलित रेल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
जैन धर्माचे 24 पैकी 20 तीर्थंकरांची मोक्ष भूमी असून, जैन धर्मियांचे सर्वात पवित्र व मोठे शाश्वत सिद्ध क्षेत्र श्री सम्मेद शिखरजी, पारसनाथ पर्वत,हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
आपल्या जीवनात दाच शिखरजी यात्रा करणारे 1008 भक्त भाविकांना याचा लाभ झाला असून,त्यात महिला,पुरुष ,लहान मोठे वयोवृद्ध सर्वांचा समावेश होता.
विशेष बाब म्हणजे,
संपूर्ण 7 दिवसीय या धार्मिक यात्रेत, येणे जाणे पासून जेवण,राहणे,खाणे व इतर सर्व प्रकारच्या धार्मिक घडामोडींचे खर्च व आयोजन एका विशेष गुरुभक्त श्रावक परिवार कडून गुप्त दान म्हणून करण्यात आले हे विशेष
या सत्कार व अनुमोदना समारोह करताना भुसावळ रेल्वे स्थानकावर भक्तांची मोठी गर्दी झाली असून यात्रा आयोजन समिती चे प्रमुख कार्यकर्ते राजेंद्रजी सेठी व इतर पदाधिकारी सोबत, भुसावळ दि.जैन समाज चे अजय कासलीवाल,चेतन जैन हेमावत,शीतल जैन,आदिनाथ वास्कर,प्रदीप गोसावी,कुणाल वास्कर,जितेंद्र जैन,मीना जैन,अमोल वास्कर व ट्रस्टी बोर्ड भुसावळ यांची उपस्थिती होती.


