भुसावळ ( प्रतिनिधी ) –
चला, एकत्र येऊया… स्त्रीत्वाचा सन्मान करूया !” असा संदेश देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम
“स्त्री शक्ती, स्त्री सामर्थ्य – नव्या युगाची नवी ओळख!” या प्रेरणादायी संकल्पनेतून सक्षम नारी फाउंडेशन भुसावळ यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महादेव मंदिर, गहुखेडा येथे विशेष महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जगाला जन्म देणारी, संस्कारांची शिदोरी देणारी आणि घर व करिअर दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना समर्पित हा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आरोग्य-जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. स्मिता रमेश झाल्टे (कोळी) – वकील संघ अध्यक्षा, जळगाव, संगिता सुधाकर तायडे – सरपंच गहुखेडा, नूतन दिलीप तायडे – सरपंच सुदगाव तसेच वत्सलाबाई रामदाल चौधरी – उपसरपंच गहुखेडा उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळीप्रेरणादायी भाषण , मासिक पाळी विषयावर नाटुकले, मनोरंजक खेळ व बक्षिसे , स्त्री आरोग्य जनजागृती उपक्रम हे या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहे .
महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “चला, एकत्र येऊया… स्त्रीत्वाचा सन्मान करूया!” असा संदेश देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


