गजानन ग्रुपतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेगाव वारी :

भुसावळ (प्रतिनिधी ) – श्री. गजानन महाराज सेवा ग्रुप संचलित गजानन ग्रुपतर्फे भुसावळ ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा नववर्षाच्या पहिल्या दिवशी, १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता भुसावळ येथून प्रस्थान करणार आहे.

पदयात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक भाविकांनी ३१ जानेवारीपर्यंत निशुल्क नाव नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे. नाव नोंदणीसाठी अध्यक्ष राजेंद्र पाटील, कौस्तुभ देवधर, शरद देवरे, अमित अग्रवाल, पद्माकर जैन, दुर्गा महाराज, संतोष शेलोडे, योगेश ठाकूर आणि विवेक चिरमाडे यांच्याशी संपर्क साधता येईल.

शहरासह परिसरातील अधिकाधिक भाविकांनी या पायी वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.