भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दि. 11 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी संगणकशास्त्र, इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी आणि कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विभागातर्फे BSc, BCA, MSc आणि MCA विदयार्थ्यांसाठी “इंटरनॅशनल सिम्पोझीया ऑन इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रोफेसर जी. आर. वाणी आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरी पाटील तसेच रिसोर्स पर्सन म्हणून सौ. अपूर्वा बऱ्हाटे(भोळे)(सोलुशन इंजिनीअर, गूगल, जर्मनी) आणि चि. भावेश जी. वाणी(रिसर्चर, पॅडरबोर्न युनिव्हर्सिटी, जर्मनी) उपस्थित होते. प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांना आजच्या बदलत्या नोकरी व व्यवसायातील AI च्या वापरानुसार आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
पहिल्या सत्रामध्ये सौ. अपूर्वा बऱ्हाटे(भोळे) यांनी विदयार्थ्यांना interview देताना कोणती काळजी घ्यावी तसेच त्यासाठी तयारी कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात चि. भावेश वाणी यांनी आपल्या सेशन मध्ये विदयार्थ्यांना रिसर्च आणि आय टी सेक्टर मध्ये AI चा कितपत वापर करावा या संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम महाजन तर आभारप्रदर्शन प्रा. तुषार पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमकरिता सुमारे 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी MCA समन्वयक प्रा. हर्षल पाटील, प्रा. डॉ. स्वाती फालक, तसेच संगणकशास्त्र विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




