ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक ९ रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित विविध विषय, व्यवसाय आणि सामाजिक व्यक्तिरेखांचे सुंदर सादरीकरण केले. डॉक्टर, पायलट, मिलिटरी मॅन, पोलिस, पोस्टमन, शेतकरी, शिक्षक, भाजीविक्रेता अशा विविध वेशभूषांमध्ये लहान मुलांनी रंगतदार प्रस्तुती देत उपस्थितांची मनं जिंकली.

शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना बक्षिसे वितरण करत मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून हर्षला चौधरी यांनी काम पाहिले.

या प्रसंगी प्राचार्या निना कटलर यांच्यासह स्मिता जाधव, वर्जनिया बर्नार्ड, स्मिता नन्नवरे, मनीषा चौधरी, क्रिस्टीना साबळे, चेतना झोपे, एलिजा फ्रान्सिस, रश्मी पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फर्लीन छाबडा आणि लॉएर्टा ब्राऊन यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्मिता जाधव यांनी केले.

फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना चालना मिळून त्यांना स्टेजवरील आत्मविश्वास वाढविण्यास मोठी मदत झाली.

फोटो ओळ – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धे वेळी उपस्थित प्रिन्सिपल नीना कटलर सोबत विविध रूपात उपस्थित विद्यार्थी. (छाया – निरज पाटील भुसावळ)