भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहर तेली समाजातर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती खडका रोड , पाटील मळा येथील समाज भवनामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका तथा जय संताजी महिला मंडळ अध्यक्षा सौ.कविताताई चौधरी ह्या होत्या .यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्ती समितीचे जिल्हा सहसचिव तथा भुसावळ शहर तेली समाज कार्यकारणी सचिव अशोक चौधरी , भुसावळ शहर तेली समाज उपाध्यक्ष .सुरेश चौधरी , कोषाध्यक्ष सुधाकर पाटील , महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका सचिव तथा ऑडिटर सुनिल चौधरी सर ,
जेष्ठ सदस्य .बाळू चौधरी ,.देविदास चौधरी ,. सुभाष चौधरी , महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका अध्यक्ष .गणेश सोनवणे ,.किरण चौधरी , महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुका खजिनदार .राकेश चौधरी , कार्याध्यक्ष .विजय अण्णा चौधरी , .नरेंद्र चौधरी ,.रोशन चौधरी , .लोटन चौधरी जय संताजी महिला मंडळ सदस्य सौ.पुष्पा सुरेश चौधरी , सौ.ज्योती दिलीप चौधरी ,सौ.वैशाली सुनील चौधरी ,सौ.गायत्री विजय चौधरी , सौ.रत्ना सुभाष चौधरी , सौ. गिता नरेंद्र चौधरी , सौ. लता दिनकर चौधरी व अन्य समाज बंधू व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल चौधरी सर यांनी केले तर आभार .सुरेश चौधरी यांनी मानले.



