जळगाव तालुक्यात तीन वेगवेगळ्या विनयभंगाच्या घटना; संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल

जळगाव- जिल्ह्यात तीन स्वतंत्र ठिकाणी तरुणी आणि दोन महिलांच्या विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या असून संबंधित संशयितांविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मदतीच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग
बकऱ्या चारण्यासाठी जात असलेल्या तरुणीला मदतीची गरज असल्याचे सांगून शेतात बोलावून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना तालुक्यातील एका गावाजवळ घडली. या प्रकरणी हरी गोरख बारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीसह गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मध्यरात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ डिसेंबर रोजी रात्री दीड वाजता ४० वर्षीय झोपलेल्या महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी धनराज सोनवणे (रा. नांद्रा बु.) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हवालदार दिनेश चव्हाण पुढील तपास करत आहेत.

शेतशिवारात महिलेला बोलावून विनयभंग
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाजवळील शेतशिवारात मदतीच्या बहाण्याने महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची तिसरी घटना घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार संशयिताविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तपास करीत आहेत.

या तिन्ही घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.