फत्तेपूर (प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फत्तेपूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लोणी ते फत्तेपुर हा सुमारे साडेतीन किलोमीटरचा पायी प्रवास करून कॅन्डल मार्च लोणी येथील भीम अनुयायांनी पार पाडला. गेल्या 22 वर्षापासून सदोदितपणे सकाळी साडेचार पाच वाजेला लोणी चे समाज बांधव कॅण्डल मार्च फत्तेपूर येथील आठवडे बाजारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी केला जातो. त्या कॅन्डल मार्चमध्ये लहान मुले तरुण उपासक उपासिका सहभागी झाले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना एक अनोखे अभिवादन या पद्धतीने केले जाते.

सकाळी सहा वाजता कॅन्डल मार्च चे आगमन फत्तेपुर येथे झाले. त्यानंतर लोणी येथील कॅन्डल मार्चचे मार्गदर्शक प्रमुख आयु. भानुदास वाघ व संजय रणित यांच्या हस्ते आणि मा. सभापती आयु एकनाथ लोखंडे तसेच फत्तेपुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.अंकुश जाधव यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्या गेले. बौद्धाचार्य माणिक लोखंडे यांनी सर्वांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर बौद्ध महासभेचे जामनेर तालुका सचिव मुकुंदा सोमवंशी, बौद्धाचार्य नंदबोधी तायडे भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हासरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, पुनाजी शेजुळे, यांनी आदरांजली पर भाषणे केली. सभेचे सूत्रसंचालन माणिक लोखंडे यांनी केले तर आदरांजलीपर भाषण करून बौद्ध महासभेचे जिल्हासचिव वसंतदादा लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले. सदरच्या सभेत राजू चव्हाण, माणिक साळवे, विशाल इंगळे, यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर भीम गीते सादर केली. आजच्या अभिवादन सभेस फत्तेपुर,लोणी, चिंचोली, येथील बहुसंख्या समाज बांधव उपस्थित होते. असे सुशीलकुमार हिवाळे फत्तेपूर यांनी कळविले आहे



