भुसावळात डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे पोलिसांचे “ब्लड, स्किन अँड हेअर चेकिंग ”

भुसावळ (प्रतिनिधी )- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे दिनांक 06 डिसेंबर 2025 (शनिवार) रोजी “ब्लड, स्किन अँड हेअर चेकिंग कॅम्प” चे आयोजन करण्यात आले. हा आरोग्य उपक्रम सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान पार पडला.

पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या आरोग्य तपासणीसह त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तणावपूर्ण परिस्थितीत कार्य करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सामाजिक कर्तव्य मानून आर्या फाउंडेशनने हा कॅम्प आयोजित केला.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डीवायएसपी संदीप गावित तथा पीआय व राहुल वाघ यांच्या हस्ते त्रिवार अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर कॅम्पचे औपचारिक उद्घाटन झाले.

या शिबिरात सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना आर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना वाघचौरे यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका मनिषा बाविस्कर यांनी केले. तसेच आयुष्यमान अरुण तायडे व आयुष्यमानि सौ. लता अरुण तायडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने ब्लड कलेक्शन, बी.पी., वजन, एसपीओ तपासण्या केल्या. त्वचा व केस तपासणीचे मार्गदर्शन व उपचार डॉ. विशाल कांकरिया यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या रजनी बडगुजर यांनी सर्व पोलीस अधिकारी तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ यांचे मनःपूर्वक आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर्या फाउंडेशनचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड परवेज खान, समीर सर, दीपक बिऱ्हाडे, तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब पाटील, नितीन सपकाळे, सोपान पाटील, जितेंद्र पाटील, सीमा चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.