भुसावळात पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक बाबासाहेब पारधी (अप्पर जिल्हाधिकारी NMRDA) यांनी पाहणी केली . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील सोबत अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .