बोदवड येथे मध्यप्रदेशातील व्यापाऱ्याला लुटले ; सात जणांविरुद्ध गुन्हा : लाखाच्या बदल्यात दिल्या नकली पाच लाखाच्या नोटा :

बोदवड (प्रतिनिधी) युट्युबवर एक लाख रुपयांच्या बदल्यात ५ लाख रुपयांचे आमिष देऊन लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने एक लाख रुपये नकार दिल्यानंतर व्यापारी आणि त्याच्या मित्राला मारहाण करून सात जणांनी रोकड घेऊन पलायन केल्याची घटना मुक्ताईनगर रोडवरील नांदगाव उड्डाण पुलाजवळ २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर रोडवर फिर्यादी प्रेमचंदजी पिपलोदिया (वय ४४, व्यवसाय-इलेक्ट्रिक दुकान, रा. डाक बंगला जवळ, सुसनेर, ता. सुसनेर, जि. आगर, मध्य प्रदेश) यांना आरोपींनी युट्यूब व्हिडिओद्वारे अमिष दाखवून फिर्यादींना वर नमुद ठिकाणी बोलावले आणि “भारतीय बच्चो का बँक” असे लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यांमधील नोटा देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, फिर्यादींनी एक लाख देण्याचे नाकारल्यावर आरोपी क्रमांक १ ते ७ यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्र गिरीराज परमानंदजी पवार यांना मारहाण करून फिर्यादीजवळ असलेली पिशवीत ठेवलेली रोकड हिसकावून नेली.

या आरोपींमध्ये सैय्यद साबीर सैय्यद शफिक (वय ३०, रा. कु-हा काकोडा, ता. मुक्ताईनगर),अंकल अशोक पारधी (वय २८, रा. रेवती, ता. बोदवड),करण किरण बोदडे (रा. शेलवड, ता. बोदवड),प्रशांत समाधान पाटील (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),सैय्यद शेरीफ सैय्यद शफिक (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),निलेश ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड), विकी ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड).यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.